12 नोव्हेंबर 2018, सह्याद्री
नारळाख्यान
नारळाख्यान
हल्ली मला मी भूगोलही छान शिकवू शकीन असं वाटू लागलंय. कर्कवृत्त ओलांडल्यापासून आम्ही शाळेत केलेला अभ्यास मला जागोजागी आठवतोय. शाळेत असतांना मी एकट्याने कधी अभ्यास केलाच नाही. सयुरी आणि मी एकत्रच अभ्यास करत असल्याने 'आम्ही' शब्द वापरला. त्यातही मला वाचनाचा कंटाळा येत असल्याने तिने वाचावे आणि मी पाय पसरवून श्रवणभक्ती करावी ही माझ्या अभ्यासाची 'पद्धत'.
शेती, माती, दगडांचे प्रकार, वातावरण, झाडं-झुडूपं, खनिज, स्थळवैशिष्ट्ये हे सगळं, इंग्रजीत आठवंत असतं. मग याला मराठीत काय शब्द असावेत असा विचार होतो. Gulf ला आखात म्हणतात हे समजायला मराठी माध्यमात शिकलेल्या शशांकला gulf म्हणजे काअंबयय हे वर्णन करून सांगावं लागलं. मग त्याला खंबातचे 'आखात' आठवले. आणि मला आखात हा मराठी शब्द मिळाला. 'आखातीदेश' या शब्दाचा अर्थ लागला. Metamorphic rocks, Fold mountains, arid climate वगैरे शब्दांसाठी मराठी शब्द मराठीतलं भूगोलाचं पुस्तक वाचल्या शिवाय नाही समजणार. कधी अश्या शब्दांवर अडलो की स्वतःला, इंग्रजी माध्यमात शिकलेला मीच तो दुर्दैवी असल्यासारखं वाटतं.
असो, या नारळाच्या आख्यानात भूगोलाचे कसले कौतूक?
तर,
नारळाची झाडं बघून झालेला आनंद वेगळाच आहे. वास्तविक नारळाचे झाड बघून आनंद कसला व्हायचा? हा प्रश्न पडणे अगदीच साहजिक आहे. पण मी एका वेगळ्या ग्रहावर गेलो होतो. जिथे लोकं, "तुमच्याकडे नारळाची झाडं असतात ना? नारळ खूप स्वस्त मिळतात ना?" असे प्रश्न फार कुतूहलतेने विचारंत!
कुतूहल, नारळाचे. ऊंचच ऊंच जाणाऱ्या माडांचे. समुद्र किनाऱ्यापासून आपण पूर्व दिशेकडे दूर जाऊ लागलो की नारळ कमी होत जातात आणि नंतर दिसेनाशी होतात.

माझ्या आजीने ज्याप्रमाणे खान्देशात नारळाचं झाड लावलं. ते फळतंही झालं. तसं एखाद दुसरं झाड उत्तरेकडच्या प्रवासात कर्कवृत्त ओलांडेपर्यंत दिसतंही. कर्कवृत्त ओलांडल्यावर मात्र नारळ दिसणे दूरापास्त होते. एखादे ठिकाणी मलईरहित शाहाळ्याचे पाणी 200मि.ली. ₹40ला वगैरे बंद बाटलीत मिळते. नाहीतर नारळ हे फळ देवाला चढवायला वापरतात म्हणून काही मंदीरांबाहेर मात्र तेवढे आवर्जून दिसते.
आजीने खान्देशात नारळाचं झाड लावायला डोंबिवलीतल्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या निरळाला कोंब आल्याचं निमित्त होतं.
जळगाव जिल्ह्यातलं एरंडोल तालुक्यातलं फरकांडे नामक खेडे गाव आमच्या कुळाचं गाव असल्याने तसा मी खान्देशी. जेवणात तीळ आणि दाणे खास. खोबरं वापरलंच तर सुकं.
जमीन वाचवायला आजोबा नोकरी सोडून गावी परतले. शेतकरी झाले. कुळ कायदा आल्याबरोबर अनेकांची असल्यासारखीच ही कथा. दोन आत्या, तीन काका आणि बाबांच्या शिक्षणासाठी एरंडोलला भाड्याची घरं बदलंत राहीले. त्या गरीबीत फरकांड्यात असलेला कुळकर्ण्यांचा वाडा डागडुजी अभावी पडला. सगळ्यांची शिक्षणं संपली. काही शेती विकून आत्यांची लग्न झाली. शेतापासून सहा कि.मी अंतरावर असलेल्या कासोद्याला उतरत्या वयात घर बांधलं गेलं. कासोद्याला रहायला आले. आजोबा गेले. आजी आमच्याकडे रहायला आली. पूजेतल्या नारळाला कोंब आल्यावर कासोद्याला घेऊन जाऊन आजीने ते रोप लावलं. कासोद्याला मे महिन्यात मागच्या पंचवीस वर्षांपासून दर पंचवीस दिवसांनंतर पाणी येतं. पाच सहा किलोमीटर दूर असलेल्या विहीरीतून पाणी आणावं लागतं. त्यातही ते झाड फळतं झालं. त्या गावातलं एकमेव नारळीचं झाड! तालुक्यातलंच असावं. काका गेला. कासोद्याशी संपर्क सुटला. नारळाच्या झापांचा त्रास होतो म्हणून शेजारच्यांनी ते तोडायची मागणी केली असल्याचं कानावर आलं. पुढे काय झालं ते माहीत नाही.

माझं दुसरं गाव मे महिन्यातलं सगळ्यांचच आवडतं, माझं आजोळ. झुकू झुकू अगीन गाडीने पळती झाडं आणि बोगदे मागे टाकत पोहोचण्यासाठीचं फणस-पोफळी, रातांबी, आंबे आणि माडांचं माहेरघर- रत्नागिरी. उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या आणि जेवण ओल्या खोबऱ्याखेरीज अपूर्ण!
आमच्या सोसायटीत डझनभर नारळाची झाडं आहेत. ती फळती झाल्याने काही घरांत कुरकूर सुरू झालीये एवढंच! जन्म, मामा बोरीवलीत राहत असल्याने मुंबईचा बाकी सगळंच डोंबिवलीचं असल्याने आणि मुंबई व डोंबिवली कोकणाचाच भाग असल्याने तसा मी कोकणस्थ! (कुठल्याही जातीशी संबंध नाही!)
अश्या या नारळाशी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असलेला मी तीन महिने या झाडापासून दूर राहिलो. नारळी पौर्णिमेला coconut chocolate देखील दुकानात दिसले नाही. तेव्हा मी हिमाचलात होतो. आणि दक्षिणेच्या प्रवासात, राजस्थानचे वाळवंट ओलांडून
गुजरातेत थारद या गावी पोहचलो. तेव्हा नारळाचा मागमूसही नव्हता. काही किलोमीटर दक्षिणेकडे आलो. कर्कवृत्त ओलांडून भुजजवळ येताच नारळीच्या झाडांनी दर्शन दिले. सौराष्ट्रात नारळीच्या बागा दिसल्यावर झालेला आनंद एखादे दुपारचे जेवण मनसोक्त शहाळ्याचे पाणी पिऊन आणि मलाई खाऊन व्यक्त केला.
सौराष्ट्रात दाण्याच्या शेतांवरचे बांध काही ठिकाणी नारळीच्या झांडांनी घातलेले दिसले. खान्देश आणि कोंकण एकाच ठिकाणी आल्यासारखं वाटलं... मग नारळ दिसत गेले. नर्मदा ओलांडली. खाड्या ओलांडल्या. बोर्डीला आलो तसे पश्चिमेचे हिरवेगार घाट दर्शन देऊ लागले.

पुढचा प्रवास कन्याकुमारीच्या दिशेने आहे. हिमाचलातल्या वळणदार न संपणाऱ्या चढ-उतारांनंतर आता पुन्हा एकदा घाट, सह्याद्रीतले. हिमालय एके ठिकाणी असह्य झाला होता. सह्याद्री नावानीशी सुसह्य आहे. हे लिहीण्यासाठीही मी सह्याद्रीच्याच कुशीत बसलोय. सायकल दुरुस्तीसाठी डोंबिवलीत ठेऊन दिवाळीच्या सुट्टीत या सह्याद्रीच्या कुशीत आलोय...
रत्नागिरी बोलवतंय, कोकण बोलवतोय, सोमनाथी भेटलेला अरबी समुद्र तेव्हापासूनच महासागराची हाक ऐकवतोय... लस्सीत मिसळायला शहाळ्याचं पाणीही केरळात वाट बघतंय.