शिस्त 'माझ्या' पासून सुरू होते आणि शब्दार्थासारखीच विस्तारत जाते. पाळलेलीही, आणि मोडलेलीही; चांगल्या आणि वाईट शब्दार्थांसारखीच!
ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राच्या 18 तारखेला जाणाऱ्या सायकल सहलीसाठीचा सराव आज एकत्रितपणे झाला. मी म्हणजे प्रबोधिनी, मी म्हणजे डोंबिवली सायकल क्लब म्हटलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. फडके पथाच्या गणेश मंदीरापाशी एकमेकांना नवीन असणारे बरेच चेहरे एकत्र भेटले.
डाॅक्टर काकांना यायला जमणार नव्हतं. त्यामुळे नेमलेल्या डी.सी.सीच्या मार्गावर मिलापनगर पर्यंत मार्गक्रमण करायची धुरा कोण सांभाळेल हा प्रश्न होता. रोहन सायकल सहलीचा प्रमुख असल्याने त्याची आज्ञा शिरसा वन्द्य मानून मिलापनगर गणेश मंदीरापाशी परिचय व अल्प विश्रांतीसाठी येऊन पोहचलो. घार्डा सर्कलपाशी डबलसायकल घेऊन मुळ्ये काका आणि बिराजदार काकां बरोबर योगेश वाट बघत होते. त्यांची शेपूटही या रांगेत चाललेल्या सायकल सापाला जोडली गेली.
सहावी-नववीतील मुलं. काहीजण पहिल्यांदाच महामार्गावर सायकल घेऊन येणारे. अक्षय आणि मल्हार वगळता बाकी सगळेच आमच्यासाठी सायकल वरील नवीन चेहरे. जरा दटावूनच नियम सांगितले गेले. ते 9.00-9.15 ला घरी पोहचे पर्यंत पाळलेही गेले. एक रांग शिस्तबद्धपणे कोणालाही मागे टाकायची घाई न करता निसर्गरम्य उंबर्ली तलावापाशी पोहचली.
महाजन काकांनी गुलकंदयुक्त राजगिऱ्याच्या वड्या आणल्या होत्या. तिथे सायकल सहलीची संपूर्ण माहिती रोहन दादाने दिली. त्या मोकळ्या परिसरात स्टंट मारायचा आनंदही नवीन सायकल स्वारांनी लूटला. पुढे नेवाळी फाट्या पर्यंत बदलापूर पाईपलाईन रोड वरून जायचं होतं. कोणीही थकलं नव्हतं यात आनंद होता. ममता मॅडम नेहमी प्रमाणेच जरा उशीराने पण उत्साहपूर्ण मनाने आम्हाला जाॅईन झाल्या.
नवीन सूर्य त्याची कोवळी किरणे अंगावर टाकत होता. भुरभूरत पसरलेल्या पांढऱ्या ढगांच्या सुवर्ण कडा अनुभवत चहापानासाठी नेवाळी फाट्याला पोहचलो. चहापान होईस्तोवर साडे आठने सहाचा काटा सोडला होता म्हणून जरा घाई करतच परतीचा प्रवास सुरू झाला.
डावीकडून पूर्व दिशेने किरणांचे झोत फेकणाऱ्या सूर्याला रस्त्याच्या सुरुवातीलाच आम्ही आडवत होतो. या रस्त्यावर आम्ही विस्तारलेल्या शिस्तीचे एक विलक्षण चित्रच जणू आम्ही रेखाटत होतो. सात वर्षांपूर्वी डी.सी.सी. ला डी.डी काकांनी लावलेली शिस्त अर्णवला पुन्हा एकदा रस्त्यावर दिसत होती. "हा रस्ता संपूच नये," अशी भावना दृढ करत होती.
मा नः पन्थानस्तिष्ठन्तु। "आमचे मार्ग कधीही थांबू नयेत."
हे वाक्य आपलं लक्ष्य आणि ब्रीद व्हावं असा विचार त्या वेळी मनात न येता तर आजची सायकलोपासना व्यर्थच जाती ना!
शेवटी प्रबोधिनीत म्हटलंच आहे. 'रोज काहीतरी नवीन सुचलंच पाहिजे. कालच्यापेक्षा आज पुढे गेलंच पाहिजे.'
-सम्प्रिः।

अतिशय सुंदर शब्दांकित उपक्रम आणि समर्पक फोटो सुद्धा. तुझ्या उपासनेत तुला ईश्वर लाभो. . .
उत्तर द्याहटवा