फिके वाटती शब्द अशक्त
भाव माझे वर्णाया
आज एकवटू धीर कैसा
अनुभव माझा सांगाया-
पहिला आरा तुटल्यावर काय झालंय हे बघायला थांबलो होतो. दोन्ही बॅगा काढून ठेवल्या होत्या सगळं लक्ष त्या डगमगत्या चाकावर होतं. तेव्हाच,
ठाकला कुठून एक
संन्यासी मज समोर
काय मिळविसी करून
भ्रान्ती जीवा
त्याने प्रश्न पृच्छिला
मी उद्देश कथिला
हसूनि त्याने मजला
निःशब्द केले
मीही त्याला पुसले
तुजला काय मिळते
ऐकून प्रश्न आनंदला
श्रोता लाभला म्हणून
बहुगुणे
कृष्ण वस्त्र त्याने धारिले
म्हणे श्वेत भगवे मजला खुपे
लोक चढविती अनंत ऋणे
हाॅटेली खाववूनि
बोले अणुपासूनि ब्रह्मांड
वसे ठायी ठायी ईश्वर
तो तुझ्यात अन् माझ्यात
जाणशील कैसा
देशाचा विस्तार
राजाचा असे धर्म
तू कोण आहेस
शत्रूस निंदाया
मंदीर आणिक मस्जिद
भांडती कैसे देव?
अडकती कर्मकांडात
भक्तजन
मायेवर बसला
तुझा रे विश्वास
पुजू तू लागलास
बांधलेस मंदीर
ईश्वर तुझ्यातला
विसरूनि गेलास
करीत बसलास दावा
मान हननाचा
हसे तो मुक्त
माझ्यासह विश्वावर
ऋण चढे बुद्धिवर
मोक्ष मिळणार कैसा?
तो म्हणे तूच पामर
घेसी कितीक ऐसे ऋण
गुंततोस वृथा मायेत
मोक्ष पळे दूर
ऐसा एक अनुभव
ग्रथितो शब्दात
चढवतो ऋण
बुद्धिवर
घडावी भेट संन्यासाची
जाणून घ्यावे मोहासी
जड जीव सकल सृष्टी
फसली असे
चरैवेति हा ब्राह्मण ग्रंथांचा आदेश आहे. तुम्ही पुढे जात राहिलात तरच तुमचं भाग्य पुढे जात राहील असे ते म्हणतात. असले अनुभव त्या ओळी सार्थकी लावतात.
15/5/2019
बोनगाईगाव रस्ता, आसाम
यावरून असे दिसते की तुला खूप मोठ्या संन्याशाचा सहवास लाभलेला असावा आणि हि अनुभूती तुला पुढे नेण्यास नक्की मदत करेल
उत्तर द्याहटवाचरैवेती . . .
👍🏼🚴🏼♂👍🏼✍🏼👌🏼👌🏼
खूप छान गांधार! त्यांचे शुभआशीर्वाद तुला फलदायी होवोत.
उत्तर द्याहटवाखूपच छान शब्दात, काव्यात तू तुझा अनुभव सांगितला आहेस. त्या साधूने तुला खूप काही सांगितले असणार त्याचे सारे सार तू ह्या काव्यात मांडलेस. Great
उत्तर द्याहटवा