पंढरीच्या विठोबाला
मी पंढरपुराहून आणले,
माझ्या दारावर त्याला
सगळ्यांसाठीच ठेवले...॥
गाभाऱ्यात मंदिराच्या
भक्ताची हेटाळणी,
मन गाभाराच व्हावे
वसो ज्ञाना तुकाची रे वाणी!॥
नाही पंढरपुरा येणे
झाले चंद्रभागेचे दर्शन
दीपले माझे मन
पाहून मंदिर तुझे छान॥
सभामंडपी कीर्तन,
देश ऐक्याचे ते गान
भक्ति-ज्ञानाच्या योगाने
हरपलेले देहभान॥
जवळ येता रे गाभरा
ओलावलल्या नेत्रकडा,
आत बघणार होतो
ट्रेनमधल्या पांडुराया॥
पैस, हरिपाठ,
अभंग अन् गवळणी
तानांची आरती
तैसी दिसे गा विठाई?॥
प्रवेशिलो गाभाऱ्यात
तैसी थाप पाठीवर
दुरून दर्शन ते झाले ,
कानी "सरका पुढे, सरका पुढे"॥
ठेवण्या मस्तक त्याचे पायी
दृष्टी पायाशी खिळलेली
थाप दुसरी पडली,
"सरका पुढे"ची ती घाई.॥
अर्पिता तुळशी हार
रूप सुंदर पाहिले, मग
तिसऱ्या थापे सरशी
सोडला गाभारा मनाने.॥
मग आलो घरी घेऊन
एक विठोबा मनीचा
ज्याचे दर्शन रे व्हावे
सकळां येता जाता...॥
-सम्प्रिः।
मी पंढरपुराहून आणले,
माझ्या दारावर त्याला
सगळ्यांसाठीच ठेवले...॥
गाभाऱ्यात मंदिराच्या
भक्ताची हेटाळणी,
मन गाभाराच व्हावे
वसो ज्ञाना तुकाची रे वाणी!॥
नाही पंढरपुरा येणे
झाले चंद्रभागेचे दर्शन
दीपले माझे मन
पाहून मंदिर तुझे छान॥
सभामंडपी कीर्तन,
देश ऐक्याचे ते गान
भक्ति-ज्ञानाच्या योगाने
हरपलेले देहभान॥
जवळ येता रे गाभरा
ओलावलल्या नेत्रकडा,
आत बघणार होतो
ट्रेनमधल्या पांडुराया॥
पैस, हरिपाठ,
अभंग अन् गवळणी
तानांची आरती
तैसी दिसे गा विठाई?॥
प्रवेशिलो गाभाऱ्यात
तैसी थाप पाठीवर
दुरून दर्शन ते झाले ,
कानी "सरका पुढे, सरका पुढे"॥
ठेवण्या मस्तक त्याचे पायी
दृष्टी पायाशी खिळलेली
थाप दुसरी पडली,
"सरका पुढे"ची ती घाई.॥
अर्पिता तुळशी हार
रूप सुंदर पाहिले, मग
तिसऱ्या थापे सरशी
सोडला गाभारा मनाने.॥
मग आलो घरी घेऊन
एक विठोबा मनीचा
ज्याचे दर्शन रे व्हावे
सकळां येता जाता...॥
-सम्प्रिः।

अतिशय सुंदरपणे नेमके सत्य मोजक्या विवेकी पद्धतीने मांडले आहेस गांधार!!!
उत्तर द्याहटवाAs usual....
Keep posting...
सोडला गाभारा मनाने.....
उत्तर द्याहटवाखरं आहे...नेमके शब्द
पण ट्रेनमधल्या पाडुराया म्हणजे?
उत्तर द्याहटवापांडुरंगाची ओळख ट्रेन मध्ये झाली. डोंबिवली-घाटकोपर दारात उभं राहून प्रवास करतांना ऐकू येणाऱ्या हरिपाठाने... आषाढी जवळ आली की बाहेर तुफान पाऊस कोसळत असायचा. ट्रेन नेहमी प्रमाणेच उशीरा येणाऱ्या, गर्दीने खच्चून भरलेल्या. त्या वीस मिनीटात टाळकरींच्या विठ्ठल नामघोषांत तल्लीन झाल्याने गर्दीचा दाब सुसह्य व्हायचा. हरिपाठ म्हणजे गर्दीवरचं टाॅनिकच जणू.म्हणून 'ट्रेन मधला पांडुराया'
हटवा