मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

सोहळा?

गर्दी ओसरली तेव्हा,
सोहळा संपला होता.

गर्दी जमली असतांना
आवाज चढले असतांना
एका पोराला,
खरंच दया आली.
हिरिरीने रिक्षा त्याने थांबवली
दवाखान्याचा पत्ता शोधला,
रिक्षावल्याने आवाज दिला,
मिसूरही न फुटलेल्या
त्या पोराकडून भाड्याचे पैसे घेतले
अगदी न विसरता!

शांत झाली बाचा बाची
दादांची आपापसातलीच
ठोकणाराही दादाच
आणि
त्याला पकडेले, तेही दादाच!
तो फरार झाला
वर्दीधारी मंडळी
अगदी तत्परतेने पोहचली
चौकशी सुरू झाली
येण्या जाणाऱ्यांची
फराराला पकडण्यासाठी!

जीव वाचला.
आयुष्यभरासाठी
पंगुत्वाचा ठपका लागला
वेदनेत कळवळणारा,
रक्ताळ चेहरा पांघरलेला,
हतबल
सायकलवालाच तो
दादांच्या यौवनात
त्याचा पाय का मोठा!

गर्दी ओसरली तेव्हा,
सोहळा संपला होता-
अपघाताचा...
-सम्प्रिः।

२ टिप्पण्या: