अरुंद झालेला रस्त्याचा भाग. चारचाकी धारी घाबरतंच, बेताच्या वेगाने, जरा कमीच पण अनक्षेपार्ह अंतर ठेऊन पुढे चाललेला. तरीही एक सायकल पडल्याचे दिसले. चला कोणाला तरी गाडीवर घ्यावं लागणार का? चारचाकी तर लागली नाही? असंख्य विचारांनी पुढे पोहचलो. गाडी पासून दूर सायकल आणि सायकलस्वार आडवे झालेले. चारचाकीतून चालक पटकन उतरला. दोघांनाही काही झालं नसल्याची खात्री केली. पाण्याची वगैरे विचारणा करून गाडी काढता झाला. एक मिनीटाचाही पूर्ण अवधी संपायच्या आत सगळे स्थिरावले. तेव्हा चौकशी केली. सायकलचाच पुढचा थांबक (ब्रेक) जोरात लागून सायकलचा तोल गेला. एवढं झालं तरी काय होतं थांबक कचकचून मारायला? भिती, अस्थिरता, संवादाचा अभाव. संवादाचा अभाव? लिखाणात भरकटतोय मी, असं वाटेल! पण नाही.
मी सायकलिस्ट कधी होईन? जेव्हा माझा अशब्द रूपी संवाद सुरू होईल. संवाद-सायकलशी, इतर वाहनांशी, शरीरावयवांशी. संवाद- रस्त्याशी. संवाद- वारा, सूर्य, चंद्र-ताऱ्यांशी. संवाद या वातावरणाशी; शेवटी संवाद म्हणजे काय हो?
परा वाणी पासून निर्मिलेला आणि परा वाणी पर्यंत पोहचलेला विचार! समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, "पुढे वैखरी, राम आदि वदावा." तीच ही आदि बोलली गेलेली वाणी, परा वाणी!
तर असा हा संवाद कमी पडल्यामुळे सकाळपासून दोन जणं पडली होती. पण सुदैवाने कोणालाही फारसे लागले नव्हते.
ही, शाळेत जाणारी सायकलसाठी नवीन असलेली मुलं, रोजच्या अपघातांच्या भितीने घाबरलेली; पालकांनी जपून सायकल चालव सांगून दटावलेली; इतकी मोठी गाडी बाजूने जाते आहे म्हटल्यावर आत्मविश्वासाभावाने बिचकली का नसती? तेच झाले. एवढी मोठी गाडी बाजूने जाते आहे लक्षात आले. मनात निर्माण केलेल्या अस्थिरतेने थांबक खेचला तो, तोल जाऊन पडण्या करताच! डोक्यावर शीररक्षक असल्याने आणि प्रसंगावधान राखून चारचाकी चालकानेही गाडी थांबवल्याने अनुभव मिळण्याखेरीज काहीच गंभीर घडले नाही. "पडीता पडीता पढलो मी" हा अनुभावाधिष्ठित शिक्षणाचा पायाच आहे जणू!
परा वाणी पासून निर्मिलेला आणि परा वाणी पर्यंत पोहचलेला विचार! समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, "पुढे वैखरी, राम आदि वदावा." तीच ही आदि बोलली गेलेली वाणी, परा वाणी!
तर असा हा संवाद कमी पडल्यामुळे सकाळपासून दोन जणं पडली होती. पण सुदैवाने कोणालाही फारसे लागले नव्हते.
ही, शाळेत जाणारी सायकलसाठी नवीन असलेली मुलं, रोजच्या अपघातांच्या भितीने घाबरलेली; पालकांनी जपून सायकल चालव सांगून दटावलेली; इतकी मोठी गाडी बाजूने जाते आहे म्हटल्यावर आत्मविश्वासाभावाने बिचकली का नसती? तेच झाले. एवढी मोठी गाडी बाजूने जाते आहे लक्षात आले. मनात निर्माण केलेल्या अस्थिरतेने थांबक खेचला तो, तोल जाऊन पडण्या करताच! डोक्यावर शीररक्षक असल्याने आणि प्रसंगावधान राखून चारचाकी चालकानेही गाडी थांबवल्याने अनुभव मिळण्याखेरीज काहीच गंभीर घडले नाही. "पडीता पडीता पढलो मी" हा अनुभावाधिष्ठित शिक्षणाचा पायाच आहे जणू!
सहा-सात वर्षांपूर्वी सायकल सहल घेऊन जावी असं ठरवतांना कितीसा विचार झाला होता, आठवत नाही. शारीरिक क्षमता ओळखून त्या अधिक ताणण्यासाठीचा हा एक उपक्रम. विद्याव्रतींचा पाठपुरावा म्हणून सुरू केला गेला. आता या उपक्रमाची व्याप्ती आणि आवाका यावर पुन्हा विचार केला असता, तो बराच विस्तारला गेल्याची जाणीव झाली. सायकलची आवड लावण्याबरोबरच पथिकाची (घरा बाहेर पडलेल्याची) वृत्तीघडण, लहानपणापासून अनुभवाने करविण्यात सायकल सहलीचा खूप मोठा वाटा असायलाच हवा. सायकलस्वार हा संपूर्ण पायी चालणारा नाही आणि वाहनधारीही नाही म्हणून त्याला 'सेमी पेडेस्ट्रियन' असा काहीसा दर्जा दिला आहे. याचा वावर रस्त्यावरील आणि पदपथावरील समस्या आणि सोयींशी झूंज देत होत असतो. हो, भारतात तरी झूंज देतंच! कारण सायकलच्या अर्थकरणाच्या प्रगतीत असलेल्या मानवी निराश वृत्तीने कुठल्याही प्रकारच्या दर्जेदार सुविधा सायकलस्वारांपर्यंत पोहचलेल्या नाहीत, भारतातच!त्याचा अनुभव या लहान वयात आल्यावर मोठेपणी खचितच उलट्या बाजूने दुचाकी चालवण्यास अगर, डाव्या बाजूने चाललेल्या सायकल जवळून दुसरे वाहन वेगाने नेण्यास ही मुलं धजावतील; तीच वृत्तिघडण.
तर, ठरल्या प्रमाणे साडे सहा वाजता सायकल सहल निघाली ती, एक बिघडलेली सायकल ठेऊन, दुसऱ्या सायकलची व्यवस्था करूनच, अगदी वेळेत! शहरा शहरातून बाहेर पडणारे तयारीचे प्रोफेश्नल सायकलस्वार रस्त्यावर, शिस्तबद्ध एका रांगेतून सायकल चालवणाऱ्या आमच्या शालेय वयोगटातील नवीन स्वारांना शुभेच्छा देऊन बदलापूरच्या दिशेने निघून गेले.
फाल्गून मासातील, वंसंत ऋतूतील मंद गारवा हवेत रेंगाळत होता. सूर्योदयाची कोवळी किरणे काही वेळात आम्हाला भिजवतील याची जाणीव गुलाब-केशरी रंगाचा उगवता थंड सूर्याचा गोळा करवून देत होता. अंबरनाथला पोहचे पर्यंत सायकलचा पुढील चाकाचा थांबक जोरात खेचून मिथिलेशचे पडून झाले होते. अंबरनाथ पुढे मागच्या वर्षीच्या सायकल सहली साठी घेतलेल्या डेटाॅलच्या बाटलीचे उद्घाटन झाले. त्याने आनंदाने ते सहनही केले. सायकल चालवायचा हट्ट सुटत नव्हता. शेवटी, "येताना सायकल चालवायला देतो" यावर मांडवणी झाली आणि भूकेल्या पोटांनी बदलापूर वेळेत गाठले. इडली चटणी आणि जिलेबीचा पोटभर नाश्ता करून पुढचा प्रवास सुरू झाला. गोळ्या-ग्लुकोण्डी ची पाकीटं फोडली गेली. उत्तर गोलार्धात दाखल होऊ पाहणारा सूर्य तीक्ष्ण होऊ पाहत होता. पण गारपीट करून आलेला थंड वारा त्याचे तेज बोथट करत होता. अकरा वाजता नेरळला नदी शोधणारे डोळे पोहचले. ऊसाचा रस पिण्यात जास्त वेळ न घालवता नदी किनारी सायकल लागल्या आणि सगळा शीण उल्हास नदीत विसर्जित केला गेला.अर्णवचा बंगला आमची वाट पाहतच होता. बारा वाजताचं तापलेलं ऊन. त्यात कपडे वाळत टाकले आणि भोजन मंत्र म्हणून जेवणाच्या डब्ब्यांवर आक्रमण चढवले गेले. नदी काठच्या ऊन्हात तापून अर्णवच्या सायकलची ट्यूब फुटली होती. अर्णवने सहल प्रमुख- रोहनला हाताशी घेऊन विश्रांती न घेता सायकल दुरुस्त केली. सरत्या घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे निघायची वेळ जवळ आली तशी, बेडरूम मधे पसरलेली शांतता भंग करावी लागली. कुठलाही नकारात्मक आवाज न काढता सगळे परतीच्या प्रवासाला नव्या दमाने सज्ज झाले. गायत्री मंत्राची उपासना झाल्यावर सेल्फी काढले गेले आणि पुनरागमनाय च म्हणत अर्णवच्या बंगल्याचा निरोप घेतला.
"I am on the road again; i wanna go places haven't ever been or seen. Ooooh, i am on the road again."डी.सी.सीने ज्याच्या बरोबर सायकलिंग केले, त्या,जग भ्रमण करतांना डोंबिवलीत मुक्काम केलेल्या ज्योशिआह स्केट्स ने शिकवलेलं गाणं म्हणून नेरळ सोडलं तेव्हा संध्याकाळी 4.30 वाजले होते. अरुंद रस्त्यावर जेव्हा दुसरा मुलगा सायकलवरून पडला तेव्हा खरंच विचार चक्र सुरू झालं. सुरक्षिततेचं. त्यावेळी असं वाटलं-
- मी माझ्या इंद्रियांनी रस्त्याला गती देणारा एक सहप्रवासी आहे.
- मी निसर्गाची हानी करून वेगवान होणाऱ्या सहप्रवाश्यांपेक्षा श्रेष्ठतर आहे.
- हे श्रेष्ठत्व मी, चंगळवादाला माझ्या पासून दूर ठेऊन कमावले आहे.
- माझी गती शमवण्याचा त्यांना, चंगळी संस्कृतीच्या, निसर्गघती धुराधरांना कुठलाही अधिकार नाही. कारण, आपल्या सगळ्यांच्याच गतीचे लगाम आपल्या हाती नाहीत.
- माझ्या रस्त्यावर मागून येत असल्यास त्यांची गती कमी करण्याचे स्वातंत्र्य मी माझ्याजवळ त्या श्रष्ठत्वानेच बाळगतो.
पश्चिमेकडील पर्वत रांगांमध्ये अस्ताला जाणारा सूर्य मला माझा पुणे-डोंबिवलीचा रोजचा प्रवास आठवल्या शिवाय मावळत नाही. तो मावळताही कसा? मी त्या लोहमार्गाला समांतर रस्त्यावरच तर होतो, ज्यावरून मी रोजचा सूर्य नव्याने बघायला शिकलो . आज तर मी माझ्या सायकलवर होतो... काळा अंधार पसरू लागला तशी पौर्णिमेला जाणारी तृतीयेची, आमावस्येकडून बाहेर पडलेली चंद्रकोर मनावरचा ताबा घेऊन गेली. बदलापूरला थांबून जरासं खाणं झालं आणि घराकडील अंधारल्या वाटांवर आमच्याकडील दिवे प्रकाश टाकत रस्ता कापू लागले. साडे आठ ते सव्वा नऊ पर्यंत सुखरूप घरी पोहचले.
ही सायकल सहल पूर्ण झाली ती मिथिलेश, शशांक, सौरभ, अर्णव वृंदा मावशी, भाग्यश्री मावशी यांच्या सहकार्याने... रोहन या सगळ्यांचा प्रमुख होता. अर्थप्रमुख मिथिलेश होता. त्याने त्या खेरीज लोकमान्य गुरुकूल मधे पाठपुरावाही केला होता. सायकलिंग हा तोंडाने स्तुती केला गेलेला उपक्रम असला तरीही आजवर वीस विद्यार्थ्यांची सायकल सहल जाऊ शकलेली नाही. नियोजित सायकल सहलीसाठी मुलं गोळा करणं हे वेगळं आव्हान असतं आयोजकांसाठीच!
शशांकने सगळ्यात मोठा त्याग केला होता, सायकलचा. कोणाला सायकल चालवणे अशक्य झाल्या शिवाय त्याला सायकल चालवता येणार नव्हती. त्याची तयारी दाखवणेही मनावर दगड ठेऊन घ्यायचा निर्णय होता. एक गाडी लायसन्सधारी दादा कडूनच चालवली जायला हवी. सौरभ, पहिल्या सायकल सहलीत सहभागी झालेला विद्याव्रती. पुन्हा मजा लूटायला सायकलसहलीत सहभागी झाला, सराव आणि सायकल नसल्याने गाडीवरच.
पालकांची चिंता आमच्या पर्यंत पोहचायच्या आत ती निरसन करायचं काम झालं नसतं तर सायकलसहल शांतपणे पार पडणं कठीण होतं. बारा जणांच्या पालकांचे किमान तीन वेळा फोन येणार म्हणजे छत्तीस फोन्सना उत्तर देण्याचे जिकरीचे काम दोन्ही मावश्यांनी पार पाडले.
आम्ही पराक्रम घडवू. आमच्या मर्यादा उल्लंघू. नवीन आव्हानं स्वीकारू. आम्ही स्वतःला बि घडवू. आमच्या बरोबर प्रत्येक मित्राला बि घडवू! हा प्रवास कृती रूपी सुरू ठेवला की आज सारखी सायकल सहल पूर्ण रित्या यशस्वी होते. सायकल सहलीत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आज पराक्रम गाजवला आहे. ही भावना उराशी बाळगूनच पुढील पराक्रमांच्या तयारीला लागायलाच हवं.
ज्ञान प्रबोधिनी पुस्तकाच्या बाहेर पडून सार्वांगीण विकासासाठी काम करत आहेच. पण त्याला साथ पालक आणि मुलांची लाभली की, एक असाच शब्दात न अडकलेला संवाद सुरू होतो. एक नवीन पुस्तक रचण्यासाठी...


अतिशय अलंकारिक शब्दांकन आणि वास्तविक समस्यांचे सालंकृत सादरीकरण झाले आहे. तरिही एक सूचना की हा ब्लॉग इतरांनाही, विद्यार्थ्यांना ही मार्गदर्शन देण्यासाठी थोड्या सोप्या भाषेत लिहिल्यास मनामनात सायकलिंग जागे होईल असे मला वाटते. बाकी तुझ्या सातत्याने दर वर्षी चालणाऱ्या या उपक्रमाला अनेक उत्तम शुभेच्छा.
उत्तर द्याहटवायातील एक-एक मुद्दा घेऊन सोप्या भाषेत समजवता येईल. फक्त ते वाचायले तितके रोचक असेलंच असे वाटले नाही. मुलांनी वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकावं अशी अपेक्षा आहे.
हटवाJabryaa
उत्तर द्याहटवाधन्यवाद, अवधूत.
उत्तर द्याहटवा"अशब्दसंवाद" खूप छान मुद्दा मांडलायस..
उत्तर द्याहटवा