सोमय्यात असतांना दृष्टी फिल्म फोरम मुळे चित्रपट बघण्याचं व्यसन लागलं. सत्यजित रेंच़े चित्रपट मनाला बंगाली शिकण्याकडे खेचून घेऊन गेले. आणि नवीन भाषेबरोबरच स्वतःचाही पुनर्जन्म झाल्याची जाणीव झाली. रविंद्रसंगीत आणि नाझरूल गीतिने अलंकारिलेली बंगाली भाषा मराठी भाषिकासाठी बोबडी वाटेलही. पण त्या मऊपणातच तिचे माधुर्य आहे.
वाङ्मयाचे विषय म्हणाल तर, बा. भ. बोरकरांसारखेच आयुष्याला निसर्गाजवळ घेऊन जाणाऱ्या भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले. सहाजिकच, वसंता सारख्या ऋतूंसाठी शब्द-वाक्यांचे अगणित रीघ लागावेत. पण वर्णन मात्र थांबू नये. वृत्त जन्माला यावीत, संपावीत पण त्यां साठी भाषा कुठेही थांबू नये.
वसंत पंचमी हा भारतीय उत्सव. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विविध नावांनी, पद्धतींनी साजरा केला जातो. या प्रसन्नदायी ऋतूत मानवी मन निसर्गाकडे बघून न आनंदले तर नवलंच!
महीना फाल्गून; नुकताच सुरू झालेला नाही तर, मध्यापर्यंत- पौर्णिमेपर्यंत पोहचलेला. वसंत ऋतूचा शिगेला पोहोचलेला काळ... त्याचं वर्णन येतं...

मित्रहो फाल्गून लागलाय वनो-वनी
पानो-पानी डहाळींवर फळा-फुलांत रे
काना-कोपऱ्यात, अडगळीत
मित्रहो फाल्गून लागलाय वनोवनी ॥धृ॥
रंगा-रंगात रंगलंय आकाश
चिंता विरल्या गाण्या-गाण्यात
पानांची सळसळ ध्वनिरूपी चंचळ
शिरली कशी मनोमनी ॥1॥
घेर ते तू पृथ्वीचे रंग आकाशाचा करती तपोभंग
हास्य मग कसे तिचे शांत ठेवी आकाशांते
ऊठ-सूठ आकाशा कंपवी ॥2॥
वनी कसा सुटला वारा फुलांचे ज्ञान न त्याला
फिरे कसा दारो दारी, फुलांच्या घरोघरी
परिचय प्रत्येका विचारी ॥3॥

फाल्गून महीन्याची पौर्णिमा म्हणजे होळी दहन! पाठोपाठ येणारी धुळवड आणि रंगपंचमी म्हणजे याच पृथ्वीवर चढलेल्या रंगांबरोबर मनावर आणि माणसांवर रंग उधळायचे आपणा भारतीयांचे हक्काचे दिवस. समूहाने एकत्र येऊन कृती करावी, मनाची दारं सताड उघडी ठेवण्याचाच उद्देश. त्याचं वर्णन...
ऐका हो गृहस्थांनो
दार उघडा, उघडा दार;
रंग लागलाय
जळी, स्थळी, वनी, तळी
लागलाय रंग
उघडा दार, दार उघडा...॥धृ॥
दार उघडा, उघडा दार;
रंग लागलाय
जळी, स्थळी, वनी, तळी
लागलाय रंग
उघडा दार, दार उघडा...॥धृ॥
रंग- मुखी उज़ळलेले- अशोकाच्या पानी
रंगीत- नशा, मेघकडा, प्रभात आभाळी
पल्लवीचा रंग चढे- उत्साही
उघडा दार, दार उघडा ॥1॥
रंगीत- नशा, मेघकडा, प्रभात आभाळी
पल्लवीचा रंग चढे- उत्साही
उघडा दार, दार उघडा ॥1॥
वेणूवन गुणगुणे वाऱ्याने दक्षिणी
फुलपाखरू डोले पुष्पी पाती
मधमाशी फिरून ज़ाई फुलांफुलांतुनी
पंख तिचे भिकार्याच्या वीणेसम गाती
माधवी लतेचा गंध दरवळलाय
उघडा दार, दार उघडा ॥2॥
फुलपाखरू डोले पुष्पी पाती
मधमाशी फिरून ज़ाई फुलांफुलांतुनी
पंख तिचे भिकार्याच्या वीणेसम गाती
माधवी लतेचा गंध दरवळलाय
उघडा दार, दार उघडा ॥2॥
नवीन भाषा शिकल्याने पुनर्जन्म होतो असे मत एका पाश्चात्य अभ्यासकाने मांडले. ते किती बरोबर, हे प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय समजणे कठीण!
ते अनुभायला या एका लोकगीताचा अभ्यास पुरेसा होता.
हे लोकगीत एका वेगळ्याच़ दुनियेत घेऊन ज़ाणारे. काव्यात बंगाल मधील भौगोलिकतेचा फरक 'दक्षिणी वारे' याने समजून येईल. आपण मराठी लोक, 'पश्चिमेच्या गार वाऱ्यात' रमतो. पण वङ्ग प्रांतात वारे वाहतात, दक्षिणेकडून. वन संपदेतील फरक वेणूच्या वना मुळे समजून येईलच. आपल्याकडे सुरूची बन असतात. आणि, समाजातील भिकार्याचे स्थान कवितेतील स्पष्ट उल्लेखानेच समज़ते. आपल्याकडचा भाकारी पावा वाजवताना रंगवला जातो. तिथे भिकारी वीणा वाज़वतोय...
भाषा शिकणे विलक्षण अनुभव देऊन जातात. या दोन गाण्यांचा अनुवादही त्याच अनुभवाचा भाग....
-सम्प्रिः।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा