बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

भाषारत-1

पुण्यात शिकतांना एक तरी भाषा नीट शिका म्हणून गुरूजनांनी टोचलेले कान. भीकबाळी घातल्याशिवाय मिरवल्यावाचून राहू शकत नव्हते. मराठी सुधरवली, सुधरवतोय. भाषेवर बराच विचार झाला. कृती मात्र वाट बघत होती.

एक छान बंगाली गाणं काल पासून डोक्यात रेंगाळत होतं...

মেঘ বলেছে 'যাব যাব', রাত বলেছে 'যাই'
আমি বলে 'মিলাই আমি আর কিছু না চাই' ।।
"मेघ बोलेछे 'जाबो जाबो', रात बोलेछे 'जाई'
आमी बोले मिलाइ आमी आर् किछू ना चाई"

मेघ म्हणतोय जाईन जाईन
रात्र म्हणतेय सरून गेली
मी म्हणे, मला मिळालो मीच तर
न काही अजून इच्छीन

शेवटच्या ओळीचा अर्थ
"निद्रेमधूनि जागा होता नवाच मी मजला दसतो." याच्या पुढची स्थिती सांगणारा वाटला.
साखर झोपेमधली स्वप्न मालिका अवतरण्याच्या स्थितीत  पोहचवण्याचं वातावरण निर्माण झालंय.
स्वप्न, भारत फिरण्याचं. स्वप्न, भाषेसाठी काम करण्याचं. स्वप्न, सायकलवरून भारत बघण्याचं. सायकलोपासनेने दृढ केलेलं एक स्वप्न ' *भा* षारत' सायकलोपासनेचं म्हणजेच, भाषेसाठी भारत भ्रमणाचं. साकारतंय.

आई-बाबांची परवानगी मिळाली आणि मी अर्ध जग जिंकलं.

आठ ते आठ नोकरी करण्याच्या चाकोरीत अडकणे मान्य नव्हते. नेट-सेट वगैरेच्या भानगडीत न पडण्याचे ठरवले. अनेक दरवाजे बंद केले आणि "আমার মুক্ত আলোয় আলোয় এই আকাশে"-"आमार मुक्ति आलोय आलोय एई आकाशे"- "माझी मुक्तता प्रकाशिली, या आकाशी"
या गाण्याप्रमाणे मेघमार्ग दिसला.

ही संकल्पना कालची नाही. ज्ञान प्रबोधिनीच्या कामा बरोबर दृढ होत गेलेला हा एक संकल्प आहे. "विज्ञान ज्ञान अमुचे परिपूर्ण होवो. अभ्यास देश स्थितीचा समतोल चालो." या प्रार्थनेतल्या ओळी भाषेच्या वैज्ञानिक दृष्टीकोनापर्यंत घेऊन गेल्या आणि भाषेला आपण "का?" असा प्रश्न विचारतो का? मातृभाषेवर आपण असा विचार करतो का? असे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी भारतभ्रमण करायला हवं. आज भाषेवर काम करण्यासाठी नेमकी गरज कुठे आहे हे ओळखायला हवं.
जसे भाषा हे केवळ माध्यम म्हणून मर्यादित राहून उपयोग नाही; तिच्या अभ्यासाची चळवळ उभी रहावी तसेच सायकलही माध्यमापुर्ती मर्यादित न राहता तिच्या वापराची चळवळ उभी रहावी. असा छंद आणि अभ्यास याची सांगड घालणारा उपक्रम मी हाती घेत आहे.

मी संकल्पना सांगितली आणि BIKE PORT Cyclingच्या सुमीत मोकल आणि शाहिर भाईंनी मला चांगली सायकल मिळावी म्हणून Scott Bicycles स्काॅट कडे खटपट सुरू केली. माझा मार्चपर्यंतचा मार्ग बघूनच #bergamont ची #helix3.5i सायकल कंपनीने देऊ केली.
आता पुढील तयारी सुरू आहे.
सायकलोपासनेचा हा पुढील टप्पा आहे #भाषारत #सायकलोपासना पुढील सव्वा वर्ष #bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia च्या सायकल वर.
एक जुलैला निघतो आहे डोंबिवलीहून...
...वाचत रहा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा