संघ आणि मी!
"संघ दक्ष"
"आरम"
या आज्ञा कानावर पडल्या की अंगणवाडीत-पहिलीत वगैरे असतांनाची दत्तनगर शाळेतील संध्याकाळ धूसरपणे आठवते. दादाचा गणवेश बघून तशी काठी मलाही हवी म्हणून त्या काठीचं मनात असलेलं आकर्षण अजूनही आठवतं. संघाला पंचाहत्तर वर्ष झाल्याचे निमित्ताने बाबांनी गणपतीसाठी विशेष आरास केली होती हे फोटो मध्ये बघितलं आहे. तेव्हा संघाचे कार्यकर्ते आले होते. घर भरून गेलं होतं. आणि दुपारीच महा आरती रंगली होती. ती आरती पण जराशी आठवते. तुकाराम नगर मधल्या घरातून मानपाडा रोडला रहायला आलो आणि मग शाखा दूरावली. नवीन इमारतीत खेळायला खूप जागा होती. त्यामुळे शाखा हा विषय हळू हळू विस्मरणात गेला. संस्कृतचा अभ्यास करायला लागल्यावर संस्कृत भारतीशी संबंध आला.
दरम्यान प्रबोधिनीच्या कामाची ओळख झाली. संस्कृत भारती आणि प्रबोधिनी या दोहोंपैकी एकाच दगडावर पाय ठेवणं हितवाह होतं. नकळतपणे प्रबोधिनीकडे कल गेला. पण प्रबोधिनीचं काम करत असतांना संघाची ओळखही आपसूकच झाली. क्रीडा भारती बरोबर झालेल्या उज्जैन-डोंबिवली सायकल यात्रेत संघाची शिस्त समजली.
*आईची भूमिका-*
मी अलिकडे एकदा आईला सहज विचारलं. "माझं शाखेत जाणं पुन्हा सुरू का नाही केलं तेव्हा?"
तिचं उत्तर ऐकून झालेलं समाधान, अवर्णनीय आणि अभिमानास्पद होतं.
"नकळत्या वयात तुझ्यावर केवळ एखाद्या विचारांचा भडिमार होऊन प्रचारक घडवायचा नव्हता. तुम्हाला समज आल्यावर आता तुम्ही अभ्यास करून ठरवा कुठल्या संस्थेचं काय काम करायचं ते. तो तुमचा निर्णय असेल. मला तुमच्यावर एखाद्या संस्थेची छाप लावण्याचा अधिकार नाही." हे उत्तर एका अर्थी प्रबोधिनीचं काम करण्याला परवानगीच होती. पण त्याच बरोबर संघाचा अभ्यास करण्यालाही प्रोत्साहन होतं.
या जानेवारी महिन्यात आपण प्रबोधिनी आणि संघाच्या प्रार्थनेचा अभ्यास करावा असं सहज वाटलं.
विचार करण्यासाठी शौचालयासारखं शांत आणि आपलंसं दुसरं कोणतंच ठिकाण नाही असं मला वाटतं. एम्. ए करतांना सूत्र पाठ करण्यासाठी सूत्रं लिहून कागद लॅमिनेट करून घरातल्या शौचालयात तो टांगायची व्यवस्था केली होती. तसंच या प्रार्थनांचेही केलं. घराचं नूतनीकरण झाल्यापासून नहाणीघर आणि शौचालय एकत्र झाल्याने या प्रार्थनांचा ऊहापोह करायला जास्त वेळ मिळू लागला.

परवा वाशिमहून अमरावतीला पोहचायचं होतं. नियोजनानुसार वर्ध्यामार्गे नागपुरला पोहचायचा रस्ता प्रचंड प्रमाणात खराब असल्याने ऐनवेळी बदलून अमरावती मार्गे पोहचणारा करावा लागला. वाशिम ते अमरावती 150 कि.मी.चे अंतर. वाशिमहून 6.30 वाजताच निघालो. 20 कि.मी. पुढे आलो असीन, रेनकोट विसरल्याचं लक्षात आलं. गुज नावाच्या गावात सायकल लावली. टमटमने वाशिम गाठलं. रेनकोट घेऊन परतलो. मार्गाला लागलो. या सगळ्यांत 10 वाजून गेले होते.
पुढचा प्रवास 130 किमी चा होता. चार वाजेपर्यंत अमरावती 50 किमी दूर राहील इतकच अंतर कापता आलं होतं. दिवसभरात पाऊस तर पडला नव्हता. पण, अमरावतीच्या दिशेकडून घनदाट ढग पाऊस घेऊन येत होते. मीही कंटाळलो होतो. थांबायचं आयतं कारण मिळालं होतं. जवळचं गाव होतं 'टाकळी.' मुख्य रस्त्यावरून 2 किमी आत शिरलो. गावात पोहचे पर्यंत पाऊस सुरू झाला होता. गावातल्या मंदीरा समोरील छप्पर असलेल्या मोकळ्या जागेत थांबलो असता चौकशी आणि चर्चा सुरू झाली. कोणीच घरी घेऊन गेलं नाही तर मी सातूचे पीठ खाऊन रात्र काढण्यासाठीची तयारी दाखवली होती. तिथे श्री व सौ. मिल्के (मामा) मला घरी घेऊन गेले व आपुलकीने सर्व व्यवस्था केली. पन्नास घरांची वस्ती असलेलं हे गाव. रोज-मजुरी करणाऱ्या मिल्के मामांची परिस्थितीही यथा तथाच. श्रीमंत मनाने गरिबीवर मात करावी असला त्यांचा पाहूणचार. गावा विषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. चौकात जाऊन तिथल्या मुलांशी गप्पा झाल्या.
गावात चौथी पर्यंतच शाळा. पुढला अभ्यास करायला 12 कि.मी दूर जरा मोठ्या शाळेत जावं लागतं नाहीतर अमरावतीला हाॅस्टेल मध्ये राहून शिक्षण घ्यावं लागतं. मिल्के मामांचा मुलगा अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात शिकला व मल्लखांब मध्ये प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरावर नाव गाजवले आहे. गावातली इतर मुलंही विविध खेळांमध्ये तरबेज आहेत. काही वर्षांपूर्वी इथे शाखा सुरू झाली. सगळी मुलं शाखेत जातात. प्रार्थना पाठ आहे. पण अर्थ माहीत नाही! मी संस्कृतमध्ये एम्.ए. केले असल्याने त्यांनी बोलता बोलता सांगितले. संस्कृत प्रार्थनेचा अर्थ सांगायची संधी मी चुकवू दिली नाही.
भारतभ्रमण सुरू झाल्यापासून अभाविपचे कार्यकर्ते, संघाशी संबंधित असलेले घर आणि स्वयंसेवक यांची न ठरवता भेट झाली. आज संघ म्हणजे लोकांच्या मनात उभे राहणारे कलूषितपूर्वग्रह दूर होतील इतकं काम या सर्वांकडून ऐकायला मिळतंय आणि बरेचदा पहायलाही मिळतंय.
आज नागपुरला पोहचलो. पाहूणचाराला दूर ठेवण्यासाठी अगदी हक्काने संघ कार्यालयात रहायला आलो. संघाचा कर्यकर्ताही नव्हतो आणि संस्कृत भारतीचे नाव सांगता येईल इतके कामही केले नव्हते. पण संघाच्या प्रार्थनेमुळे या विषयी कुठलाही त्रास होणार नाही एवढा विश्वास होता.
राजकारण, डावे-उजवे विचारसरणीतील वाद या सगळ्यांना अभ्यासात स्थान नाही. डाव्या उजव्यांमधील दुवा भाषा आहे. आज संघा विषयी लिहीतांना अनेकांना वाद निर्माण करण्याची इच्छा होईलही कदाचित्. पण अभ्यासात त्याला स्थान नाही...
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #cyclopasana #सायकलोपासना

वाह्.....खरं आहे....
उत्तर द्याहटवा